कुची येथे हौदात पडुन बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:20 IST2021-06-06T04:20:44+5:302021-06-06T04:20:44+5:30

घाटनांद्रे : कुची (ता. कवठे महांकाळ) येथे गावापासून पूर्वेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेरी मळा येथील आर्यन राजाराम ...

Child dies after falling into a pond at Kuchi | कुची येथे हौदात पडुन बालकाचा मृत्यू

कुची येथे हौदात पडुन बालकाचा मृत्यू

घाटनांद्रे : कुची (ता. कवठे महांकाळ) येथे गावापासून पूर्वेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेरी मळा येथील आर्यन राजाराम जाधव (वय ५) या बालकाचा हौदातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी दुपारी बारा वाजता निदर्शनास आली.

कुची येथील आर्यन जाधव शनिवारी सकाळी अंगणात खेळत हाेता. अन्य कुटुंबीय द्राक्षबागेत कामासाठी गेले हाेते. खेळता-खेळता ताे घरासमोर जनावरांसाठी व वापरण्यासाठी बांधलेल्या पाण्याच्या हौदात पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सदस्य घरी आल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. बालकाच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. घटनेची नाेंद कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास कवठे महांकाळ पोलीस करीत आहेत.

Web Title: Child dies after falling into a pond at Kuchi