मिरजेत मुलाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:21 IST2021-06-04T04:21:29+5:302021-06-04T04:21:29+5:30

मिरजेत दोन दुचाकींची चोरी मिरज : मिरजेतील सह्याद्रीनगर व स्टेट बँकेच्या पार्किंगमधून दोन दुचाकी अज्ञाताने चोरून नेल्या. याबाबत गांधी ...

Child abduction in Miraj | मिरजेत मुलाचे अपहरण

मिरजेत मुलाचे अपहरण

मिरजेत दोन दुचाकींची चोरी

मिरज : मिरजेतील सह्याद्रीनगर व स्टेट बँकेच्या पार्किंगमधून दोन दुचाकी अज्ञाताने चोरून नेल्या. याबाबत गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह्याद्री नगर येथून महादेव विठ्ठल राठोड यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी व स्टेट बँकेच्या पार्किंगमधून नेताजी तुकाराम कदम यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची तक्रार आहे.

पोषण आहार किट वाटप

मिरज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय बंद असल्याने अडचणीत असलेल्या रिक्षाचालकांना मिरजेतील "रुग्ण सेवा प्रकल्प" संस्थेतर्फे अन्नदा पोषण आहार किट वाटप करण्यात आले. मिरजेतील मैदान दत्त मंदिर परिसरात शहर पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या हस्ते पंचवीस रिक्षाचालकांना आहार किटचे वाटप करण्यात आले. यावेळी नामदेव भोसले, डाॅ. भालचंद्र साठ्ये, मोहन वाटवे, मिलिंद भिडे, तेजस गाडगीळ, भरत देशपांडे, संजय गोडबोले, तानाजी शिंदे उपस्थित होते.

बेळगली यांचा स्मृतिदिन

मिरज : नॅशनल असोसिएशन फाॅर दि ब्लाइंड सांगली या संस्थेच्या संस्थापिका कै. शोभना बेळगली यांचा स्मृतिदिन संस्थेच्या कूपवाड येथील अंधशाळेत पार पडला. यावेळी अंधशाळेचे चेअरमन अशोक तुळपुळे, कार्यकारी सचिव सतीश पाठारे, सचिव उदय माने, अंध शाळेतील शिक्षिका सौ. एस.के. हिरीकुडी व गायकवाड उपस्थित होत्या.

Web Title: Child abduction in Miraj