चिखलीत विराज नाईक यांचा ‘विश्वास’तर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:57+5:302021-06-16T04:35:57+5:30
फोटो ओळी : चिखली (ता. शिराळा) येथे विराज नाईक यांचा बाबासाहेब पाटील-सरूडकर यांनी सत्कार केला. लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा ...

चिखलीत विराज नाईक यांचा ‘विश्वास’तर्फे सत्कार
फोटो ओळी : चिखली (ता. शिराळा) येथे विराज नाईक यांचा बाबासाहेब पाटील-सरूडकर यांनी सत्कार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : युवा नेते विराज नाईक यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात युवकांचे संघटन मजबूत होईल, असे प्रतिपादन विश्वास कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथे सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विराज नाईक यांचा कारखान्याच्या संचालक मंडळामार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष नाईक यांचा बाबासाहेब पाटील-सरूडकर यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी संचालक संभाजी पाटील, विश्वास पाटील, सुरेश पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी पाटील, बिरुदेव आमरे, दत्तात्रय राणे, शामराव मोहिते, यशवंत दळवी, विष्णू पाटील, बाळासाहेब पाटील, तानाजी वनारे, दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील उपस्थित होते. हंबीरराव पाटील यांनी आभार मानले.