शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी इस्लामपूर दौऱ्यावर, जयंत पाटीलांच्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 19:28 IST

हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टींवर लक्ष केंद्रित

अशोक पाटीलइस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेतील हवा काढून घेतली असली, तरी त्यांच्या मतदारसंघात विरोधक राजकीय हवा तयार करण्यासाठी सरसावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांचा शिवसेनेचा गट शक्तिप्रदर्शाची जोरदार तयारी करीत असल्याने जयंतसेना अस्वस्थ दिसत आहे.

जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात २५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दावा मजबूत करीत एकीकडे राजू शेट्टी यांना ‘टार्गेट’ केले जात आहे, तर दुसरीकडे जयंत पाटील यांचा मतदारसंघ काबीज करण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे.काही दिवसांपूर्वी जयंत पाटील भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. या चर्चेने इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात भाजप नेते अस्वस्थ झाले होते. जयंत पाटील यांच्या समर्थकांमध्येही या चर्चेने संभ्रम निर्माण केला होता. जयंत पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करीत दोन्हीकडील नेते व कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर केला.

दक्षिण महाराष्ट्रात भाजपकडे खमके नेतृत्व नसल्याने भाजप जयंत पाटील यांच्यावर दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे बोलले जात आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाकडे आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना ताकद देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या निमित्ताने इस्लामपूर व शिराळा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.इस्लामपूर मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी पक्षाचे अस्तित्व जिवंत ठेवले आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे असतो; परंतु भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी विधानसभेची तयारी केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही भाजपकडून चाचपणी केली गेली आणि उमेदवारीसाठी राहुल आवाडे यांना कानमंत्र देऊन शिवसेनेविरुद्ध डाव केला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तसेच इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठीची खेळी कितपत यशस्वी होणार, याची चर्चा राजकीय पटलावर रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इस्लामपूर दौरा शासकीय आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने ते येत आहेत यामध्ये कोणतेही राजकारण नाही. - खासदार धैर्यशील माने, हातकणंगले 

मुख्यमंत्र्यांनी इस्लामपूर मतदारसंघातील अनेक कामांसाठी निधी दिला असून यातील काही कामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  -आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना, शिंदे गट

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे