मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इस्लामपूर दौऱ्यावर

By Admin | Updated: May 28, 2017 23:29 IST2017-05-28T23:29:02+5:302017-05-28T23:29:02+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इस्लामपूर दौऱ्यावर

Chief Minister Devendra Fadnavis on tour to Islampur today | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इस्लामपूर दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इस्लामपूर दौऱ्यावर


लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि वाळवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, सोमवारी इस्लामपूर दौऱ्यावर येत आहेत.
फडणवीस यांचे दुपारी १ वाजता शहरामध्ये आगमन होईल. कऱ्हाड येथील कार्यक्रम आटोपून ते मोटारीने इस्लामपूरकडे मार्गस्थ होतील. पेठ रस्त्यावरील कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानी भोजन व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. तेथून यल्लम्मा चौक येथील शेतकरी मेळावा आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, शहराचे गटनेते विक्रम पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
इस्लामपूर येथील मेळाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने गारगोटीकडे प्रस्थान करतील.

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis on tour to Islampur today