छाया पाटील यांची पश्चिम महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST2021-04-10T04:26:27+5:302021-04-10T04:26:27+5:30

छाया पाटील यांची पश्चिम महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी दिले ...

Chhaya Patil elected as General Secretary of Western Maharashtra Women's Nationalist Congress | छाया पाटील यांची पश्चिम महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड

छाया पाटील यांची पश्चिम महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड

छाया पाटील यांची पश्चिम महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी दिले यावेळी

प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, अलका पाटील, सुनीता देशमाने, अलका शहा उपस्थित होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष छाया अनिल पाटील (कामेरी) यांची पश्चिम महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात त्यांना निवडीचे पत्र दिले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी छाया पाटील मोठे योगदान देतील, असा विश्वास प्रदेश अध्यक्षांनी व्यक्त केला. छाया पाटील यांनी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून चांगले काम केल्याने त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. यावेळी कामेरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष अलका पाटील, वाळवा तालुका कार्याध्यक्ष सुनीता देशमाने, जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या अलका शहा उपस्थित होत्या.

Web Title: Chhaya Patil elected as General Secretary of Western Maharashtra Women's Nationalist Congress