दत्तात्रय काेळेकर यांच्या कारभाराची चाैकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:32+5:302021-06-30T04:17:32+5:30
शिंदे म्हणाले, उमदी पोलीस ठाण्यात हद्दीत अवैध धंदे वाढले आहेत. उमदी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चेकपोस्टनजीकच गावगुंडाच्या टोळीने तलवारीच्या ...

दत्तात्रय काेळेकर यांच्या कारभाराची चाैकशी करा
शिंदे म्हणाले, उमदी पोलीस ठाण्यात हद्दीत अवैध धंदे वाढले आहेत. उमदी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चेकपोस्टनजीकच गावगुंडाच्या टोळीने तलवारीच्या धाकाने नवविवाहित तरुणीस पळवून नेले. अद्याप त्याचा काडीमात्र तपास उमदी पोलिसांनी केला नाही. कोरोना महामारीत ग्रामपंचायत व नागरिकांनी स्वयंपूर्तीने गाव बंद ठेवून कोरोनाचा अटकाव केला. मात्र, सहायक पाेलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी त्यास काेणतेही सहकार्य केले नाही. गावात विनाकारण फिरणाऱ्यांवर काेणतीही कारवाई केली नाही. उलट दहशत माजवण्यासाठी दूध घालण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यासह कामासाठी जाणाऱ्या मजुरांची अडवणूक करून नाहक त्रास दिला. जाणूनबुजून काही दुकानदारांकडून १०-१० हजार रुपये दंड वसूल केला. तंटा मिटवण्यासाठी गेलेल्या प्रतिष्ठित व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकारही उमदी पोलिसांनी केला आहे. यामुळे दत्तात्रय काेळेकर यांच्या कामाची चाैकशी करून त्यांची बदली करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिला. यावेळी माजी उपसरपंच चंदू नागणे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव सातपुते, सरदार जकाते आदी उपस्थित होते.