कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST2021-09-15T04:31:01+5:302021-09-15T04:31:01+5:30
ओळ : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील प्रेरणा फाैंडेशनतर्फे कामेरी प्राथमिक आराेग्य केंद्रास कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आले. यावेळी रणजित पाटील, ...

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा
ओळ : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील प्रेरणा फाैंडेशनतर्फे कामेरी प्राथमिक आराेग्य केंद्रास कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आले. यावेळी रणजित पाटील, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारे आदी उपस्थित हाेते.
कामेरी : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाबरोबरच ग्रामीण भागात समाजकार्य करणाऱ्या प्रेरणा फाैंडेशनसारख्या सेवाभावी संस्थांनी मदतीसाठी पुढाकार घेतला, तर गोरगरीब नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातच ऑक्सिजन व अन्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन वाळवा विभागाचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारे यांनी केले.
कामेरी (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी येडेनिपाणी येथील प्रेरणा फाैंडेशनने पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट दिले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, माजी महिला बालकल्याण सभापती सुषमा नायकवडी, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा जाधव, पंचायत समिती सदस्या सविता पाटील, आनंदराव पाटील, डॉ. प्रकाश पाटील, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, उपसरपंच योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी स्वागत केले. प्रेरणा फाैंडेशनचे संस्थापक सचिन यादव यांनी प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत सदस्य पोपट कुंभार यांनी आभार मानले. प्रेरणा फाैंडेशनचे व्यवस्थापक अजित लोखंडे, समन्वयक प्रतिमा रंकाळे यांनी संयोजन केले.