शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या विमानोड्डाणाला ‘ब्रेक’; सहली लांबणीवर; सुटीच्या मोसमातच ट्रॅव्हल एजन्सीजना फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 17:49 IST

दुबई, साैदी अरेबियासह विविध सहलींच्या नियोजनात बदल

सांगली : सुटीच्या मोसमात नियोजित केलेल्या दुबईच्या सहलींना युद्धामुळे ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील सुमारे २५० लोकांनी दुबई, सौदी अरेबियाच्या नियोजित सहली लांबणीवर टाकल्या आहेत. आखाती देशांबरोबरच अन्य देशातील सहलींच्या बुकिंगलाही सध्या फारसा प्रतिसाद नसल्याने ट्रॅव्हल एजन्सी चालकांना आर्थिक फटका बसत आहे.युद्धामुळे एकीकडे आयात-निर्यातीला ब्रेक लागला असतानाच आता पर्यटकांच्या नियोजनालाही फटका बसला आहे. फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत पर्यटनाचा मोसम असतो. फेब्रुवारीअखेरीस बुकिंग करण्यात आलेल्या आखाती देशांच्या सहलींच्या नियोजनाचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. युद्धामुळे बहुतांश ट्रीप लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. युद्धाचा कालावधी वाढला तर या सहली रद्द होण्याचीही भीती आहे.एजन्सी चालकांच्या मते, दरवर्षी सांगली जिल्ह्यातून दुबईला मोठ्या प्रमाणावर सहलींचे नियोजन केले जाते. यंदाही तसे बुकिंग झाले होते. मात्र, युद्ध सुरू होताच या सहलींच्या नियोजनात बदल केले जात आहेत. काही एजन्सी चालकांच्या मते, अन्य देशातील बुकिंगला प्रतिसाद आहे. तर काहींच्या मते, युद्धाच्या परिस्थितीमुळे परदेशातील अन्य ठिकाणच्या सहलींबाबतही पर्यटक सुरक्षेवरून साशंक आहेत.

वर्षभरात दोनदा फटकाट्रॅव्हल एजन्सी चालकांना वर्षभरात दोन्ही सुटीच्या मोसमात फटका बसला. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या सहली रद्द झाल्या होत्या. देशांतर्गत पर्यटनाला फटका बसला होता. आता मार्च २०२६ मध्ये आखाती देशातील सहलींवर परिणाम झाला आहे.

आमच्याकडे दुबईसाठी ५ ग्रुपने बुकिंग केले होते. ते आता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे यंदाच्या बुकिंगलाही फटका बसला आहे. मार्च महिन्यातील बुकिंगचे प्रमाण घटले आहे. -मुकुंद माने, ट्रॅव्हल एजन्सी चालक 

सध्या ८ ते १० टक्के सहलींच्या नियोजनावर परिणाम झाला आहे. दुबईला नियोजित असलेल्या सहली लांबणीवर टाकाव्या लागत आहेत. मागील वर्षी पर्यटनाच्या मोसमातच पहलगाम हल्ल्याचा फटका बसला होता. यंदा युद्धामुळे एजन्सी चालकांना धक्का बसला आहे. - मंगेश शहा, ट्रॅव्हल एजन्सी चालक

English
हिंदी सारांश
Web Title : War puts a stop on tourist flights; travel agencies affected.

Web Summary : War halts Dubai trips from Sangli, impacting travel agencies. Bookings decline due to safety concerns. Agencies face losses after previous Kashmir incident disrupted domestic tourism.