शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलांची बस अंधारातच का धावते?, मिरज तालुक्यातील प्रकार; मुलांचा जीव मुठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 16:36 IST

आमदारांच्या पत्राला किंमत नाही

सांगली : पहाटेची बस बंद झाल्याने गावातील पोरांना सोडण्यासाठी पालकांची कसरत सुरू झाली आहे. सायंकाळच्या बसने उशिरा रात्रीचा प्रवास सुरू केल्याने परतीच्या प्रवासात गावातील निर्जन स्थळावरून घर गाठताना मुले भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. मिरज तालुक्यातील सावळी, तानंग, कानडवाडी, मानमोडी, कांचनपूर, अहिल्यानगर, खोतवाडी याठिकाणच्या शेकडो मुलांचा हा प्रश्न एसटी महामंडळाकडून बेदखल केला गेला आहे.सांगली ते मानमोडी ही सकाळी सहाची बस आता बंद झाली आहे. त्यामुळे भल्या पहाटे उठून पालकांना अंधारातच शहरातील शाळा, क्लासेस, अकॅडमीमध्ये सोडावे लागत आहे. पालकांची यामुळे कसरत सुरू झाली आहे. मुलांना शाळा, क्लासेसमधून परतायचे असल्यास सांगली ते मानमोडी ही सहा वाजेची बस आहे. ती नेहमी उशिरा सुटते व अंधारात धावत येऊन मुलांना सोडते. निर्जन रस्त्यावरून या मुलांना भीतीच्या छायेखाली वावरत घर गाठावे लागते. हा प्रकार गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे पालक हैराण झाले आहेत. तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही.मुलांच्या शिक्षणात बसमुळे अडथळेसकाळची बस बंद असल्यामुळे अनेक पालक दुचाकीवरून त्यांना शहरात सोडतात. मात्र, ज्यांच्याकडे दुचाकीसुद्धा नाही किंवा संबंधित पालकांना कामानिमित्त बाहेर राहावे लागते अशांची मुले अनेकदा शाळेत जात नाहीत. त्यांच्या शिक्षणात बससेवेअभावी अडथळा निर्माण झाला आहे.आमदारांच्या पत्राला किंमत नाहीमिरजेतील या छोट्या गावातील मुलांच्या प्रश्नाची आमदार मोहनराव कदम यांनी दखल घेतली. त्यांनी याबाबतचे एक पत्र एसटी महामंडळाला दिले. त्या पत्रालाही अदखलपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

काय आहे मागणी

  • मानमोडीतून सकाळची बससेवा पूर्ववत करावी
  • सांगलीच्या स्टँडवरून मानमोडीला जाणारी बस सव्वापाच वाजता सोडावी.
  • स्टँडवर लाउडस्पीकरवर बसबाबतची माहिती देण्यात यावी

सांगली ते मानमोडी मार्गावर बस पूर्वीप्रमाणे वेळेवर सोडण्याबाबत निवेदन दिले आहे. सायंकाळची बस सव्वापाच वाजता स्टँडवरून सोडल्यास सर्व मुली वेळेवर घरी पोहोचतील. महामंडळाने विद्यार्थ्यांना बेदखल करण्याची मानसिकता बदलून त्यांच्या सोयीचा विचार करायला हवा. - सुभाष खोत, जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस

टॅग्स :SangliसांगलीStudentविद्यार्थी