पेठ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी चंद्रकांत पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:20 IST2021-02-20T05:20:29+5:302021-02-20T05:20:29+5:30
पेठ : येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महाडिक गटाचे चंद्रकांत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच मीनाक्षी महाडिक यांच्या ...

पेठ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी चंद्रकांत पवार
पेठ : येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महाडिक गटाचे चंद्रकांत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच मीनाक्षी महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड झाली. ग्रामविकास अधिकारी एम.डी. चव्हाण यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रामपंचायतीमध्ये महाडिक गटाची सत्ता असून, दीपक कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, जिल्हा परिषद बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, पंचायत समिती सदस्या वसुधा दाभोळे, माजी उपसरपंच शंकर पाटील, दीपक कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रकांत पवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच आमीर ढगे, उत्तर भाग सोसायटीचे माजी अध्यक्ष विशाल शेटे, सयाजी कदम, राहुल पाटील, भानुदास गुरव, कृष्णात पाटील, गोरख मदने, ग्रामपंचायत सदस्य बेगमबी जमादार, संगीता शेलारे, उषा मदने, ज्योत्स्ना गुरव, भगवान कदम, संतोष माळी, विकास दाभोळे, युवराज शिंदे, राजेंद्र पवार, जितेंद्र पवार, राजेंद्र पाटसुते आदी उपस्थित होते.