चंद्रकांत पाटील यांची सिनर्जी हॉस्पिटलला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST2021-09-02T04:55:14+5:302021-09-02T04:55:14+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरज येथील सिनर्जी हॉस्पिटलला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी महसूलमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा ...

चंद्रकांत पाटील यांची सिनर्जी हॉस्पिटलला भेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरज येथील सिनर्जी हॉस्पिटलला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी महसूलमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज देशमुख, हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, शेखर इनामदार, डॉ. सुरेश पाटील, निरंजन आवटी आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी हॉस्पिटलच्या विविध विभागांना भेट दिली. रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली. ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील योग्य उपचारपद्धती, अत्याधुनिक रुग्णसेवा, कुशल वैद्यकीय कर्मचारी व आधुनिक ऑपरेशन थिएटर्स व इतर सुविधा असणारे उच्च दर्जाचे हॉस्पिटल आहे.
आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले. मी स्वतः रुग्ण म्हणून या हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. मला अत्यंत चांगली सेवा मिळाली. उत्कृष्ट भोजन, आपुलकीची सेवा देणारा कर्मचारी वर्ग येथे आहे.
पृथ्वीराज देशमुख म्हणाले, आमच्या भागातून अनेक रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. रुग्णसेवा अत्यंत चांगली आहे. पेशंटची योग्य काळजी घेतली जाते.
यावेळी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. आरळी यांची भाजप वैद्यकीय आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. यावेळी हॉस्पिटलचा प्रशासकीय वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपस्थित होता.