शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

सांगलीत शिवसेनेकडून चंद्रहार पाटील?, प्रचाराला लागण्याचे ‘मातोश्री’वरून पदाधिकाऱ्यांना आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:02 IST

सांगली : कोल्हापूर लोकसभेच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय अंतिम झाला आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील यांना शिवसेनेचा उमेदवार ...

सांगली : कोल्हापूर लोकसभेच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय अंतिम झाला आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील यांना शिवसेनेचा उमेदवार गृहीत धरून प्रचाराला लागण्याचे आदेश ‘मातोश्री’वरून जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना बुधवारी देण्यात आले.महाविकास आघाडीची सांगली व कोल्हापूरच्या जागेच्या अदलाबदलीची चर्चा आठवडाभरापासून सुरू आहे; परंतु, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील सांगलीच्या शिष्टमंडळाने ही जागा शिवसेनेस देण्यासाठी मुंबईत मंगळवारी झालेल्या बैठकीत विरोध केला होता. त्यानंतर बुधवारी दिवसभरात आणखी काही घडामोडी घडल्या.दरम्यान, शाहू छत्रपती कोल्हापूरची जागा काँग्रेसकडून लढण्यास तयार झाले. त्यामुळे सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय बुधवारी झाला आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी गृहीत धरुन लोकसभा मतदासंघात प्रचार व मोर्चेबांधणी सुरू करावी. काही दिवसांत त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर होईल, असे संदेश शिवसेना पदाधिकाऱ्यांना बुधवारी सायंकाळी देण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, अधिकृतपणे उमेदवारी जाहीर होईपर्यंत प्रतिक्रिया देण्यास चंद्रहार पाटील यांनी नकार दिला.

आता काँग्रेसची भूमिका काय?डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील काँग्रेस शिष्टमंडळाने मुंबईतील बैठकीत लोकसभेच्या जागेवरून आक्रमक भूमिका घेतली होती. आता महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय जाहीर होण्याची वाट पाहणार की काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील वेगळी भूमिका घेणार? याविषयी उत्सुकता आहे.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे