शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

संखमध्ये चंदनसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 10:34 PM

सांगली : संख (ता. जत) येथील रेपगुड वस्तीवरील एका घरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी छापा टाकून दीडशे किलो चंदनाची लाकडे व इलेक्ट्रानिक वजनकाटा असा पावणेचार लाखांचा माल जप्त केला. याप्रकरणी भिमाण्णा उर्फ तम्मा चन्नाप्पा भोसले (वय ३७) यास अटक केली आहे.भिमाण्णा भोसले हा कर्नाटकातून चंदनाची झाडे तोडून त्याचा घरात ...

सांगली : संख (ता. जत) येथील रेपगुड वस्तीवरील एका घरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी छापा टाकून दीडशे किलो चंदनाची लाकडे व इलेक्ट्रानिक वजनकाटा असा पावणेचार लाखांचा माल जप्त केला. याप्रकरणी भिमाण्णा उर्फ तम्मा चन्नाप्पा भोसले (वय ३७) यास अटक केली आहे.

भिमाण्णा भोसले हा कर्नाटकातून चंदनाची झाडे तोडून त्याचा घरात साठा करुन विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या पथकाने रेपगुड वस्तीवरील भोसलेच्या घरावर छापा टाकला. छाप्याची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्यास पकडले. घराची झडती घेतल्यानंतर सात पोत्यांमध्ये चंदनाची लाकडे आढळून आली. दीडशे किलोचे हे चंदन आहे. चंदन विक्रीसाठी वापरण्यात येणारा इलेक्ट्रानिक वजनकाटाही जप्त केला. भोसलेविरुद्ध उमदी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिंदे, हवालदार अशोक डगळे, अमित परीट, राहूल जाधव, अझर पिरजादे, चेतन महाजन, सचिन सुर्यवंशी व किशोर काबूगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.