रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणाच्या तांत्रिक तपासाचेच आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:26 IST2021-05-14T04:26:29+5:302021-05-14T04:26:29+5:30

सांगली : मिरज कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्याला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना पकडण्यात आले होते. पोलिसांकडून तपास अधिकारी बदलून पुन्हा नव्याने ...

The challenge of the technical investigation of the Remedesivir black market case | रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणाच्या तांत्रिक तपासाचेच आव्हान

रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणाच्या तांत्रिक तपासाचेच आव्हान

सांगली : मिरज कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्याला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना पकडण्यात आले होते. पोलिसांकडून तपास अधिकारी बदलून पुन्हा नव्याने या काळाबाजार प्रकरणाची चौकशी सुरू केली असलीतरी मिरज शासकीय रुग्णालयाकडून पुन्हा एकदा त्रोटक अहवालच पोलिसांना सादर केल्याने तपासाच्या अडचणी आहेत. याबाबत तपास अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला असलातरी प्रत्यक्षात तांत्रिक तपासाचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मिरज शासकीय रुग्णालयात कर्मचारी असलेला सुमित हुपरीकर आणि त्याचा मित्र असलेल्या दावीद वाघमारे यांना रेमडेसिविरचे इंजेक्शन ३० हजारांना विक्रीच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी अटक केली होती.

त्यानंतर विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पहिल्या टप्प्यातही रुग्णालयाच्या चौकशी समितीने त्रोटक अहवाल दिला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याप्रकरणी गांभीर्य ओळखून तपास अधिकारी बदलून नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निर्धारित वेळेत त्यांना आपला अहवाल सादर करावयाचा आहे.

मिरज शासकीय रुग्णालयाकडून मिळालेला अहवाल हा पुन्हा कमी माहितीचा व नेमक्या घटनेचा उलगडा होऊ शकत नाही. त्यामुळे पोलिसांकडून सविस्तर अहवाल आवश्यक आहे. रेमडेसिविर इंजेक्शन बाहेर विक्री करताना त्यावरील बॅच क्रमांक खोडण्यात आला होता. त्यामुळे काळाबाजार झालेले इंजेक्शन आमच्याकडील नसल्याचाही पवित्रा आता घेण्यात आला आहे.

त्यामुळे इंजेक्शनची बॅच क्रमांकच नसल्याने पोलिसांना या काळाबाजार प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी अडचणी येणार आहेत. तरीही पूर्ण अहवाल सादर केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकट

सोमवारी सविस्तर अहवालाची प्रतीक्षा

सविस्तर अहवाल पाठविण्याबाबत पोलिसांकडून पत्र सादर करण्यात आले आहे. तरीही सलग तीन दिवस शासकीय सुटी असल्याने अहवाल मिळू शकला नाही. त्यामुळे सोमवारी रुग्णालय प्रशासनाकडून अहवाल मिळेल. त्यानंतर पुढील तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: The challenge of the technical investigation of the Remedesivir black market case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.