शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन योजनांच्या पूर्णतेचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 16:25 IST

टेंभूच्या ४ हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांचा द्वितीय सुधारित प्रकल्प अहवाल व ताकारी-म्हैसाळ योजनांच्या ४ हजार ९५९ कोटी ९१ लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवाल देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मंजूर आहे.

प्रताप महाडिक ।कडेगाव : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या लाभक्षेत्रातील अद्याप सिंचनाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या कायम दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना या योजनेच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा आहे. पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यातील या योजना जून २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारपुढे उभे आहे.

टेंभूच्या ४ हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांचा द्वितीय सुधारित प्रकल्प अहवाल व ताकारी-म्हैसाळ योजनांच्या ४ हजार ९५९ कोटी ९१ लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवाल देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मंजूर आहे. यामुळे निधी मिळण्याचा मार्ग मोकळाच आहे. परंतु या कामांना गती देऊन जून २०२० पर्यंत या योजना पूर्ण करायच्या आहेत.टेंभूच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील कºहाड, सांगली जिल्ह्यात कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अशा एकंदरीत ७ तालुक्यातील २४० गावांमधील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्रास पाणी मिळणार आहे. आतापर्यंत योजनेवर २ हजार ४०० कोटी इतका खर्च झाला. बळीराजा संजीवनी योजनेतून टेंभू योजनेसाठी १ हजार २०० कोटी निधी मंजूर आहे.

यापैैकी ७०० कोटींचा निधी मिळाला आहे. अजूनही ५०० कोटींचा निधी मिळणार आहे. योजनेसाठी एकंदरीत ३ हजार १८४ कोटी ८८ लाख इतका प्रत्यक्ष खर्च होणार आहे. उर्वरित ९४० कोटी ६ लाख इतका इतर अनुषंगिक खर्च आहे.

ताकारी व म्हैसाळ या दोन्ही योजनांच्या माध्यमातून २८८ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. या योजनांसाठी २ हजार ३७० कोटींचा खर्च झाला आहे. या योजनांच्या पूर्णत्वासाठी १ हजार ४०० कोटींची गरज आहे. इतर अनुषंगिक खर्च वजा जाता, प्रकल्प अहवालानुसार मंजूर निधीतूनही ५०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी सिंचन प्रकल्प योजनेतून या योजनांसाठी गरजेनुसार तात्काळ निधी मिळत आहे. टेंभूसह ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांची कामे अपूर्ण असल्यामुळे कृष्णा खोरेच्या वाट्याचे पाणी कर्नाटक व आंध्रमध्ये जात आहे. हे पाणी सिंचनाच्या माध्यमातून दुष्काळी भागात आणले पाहिजे.

या तिन्ही योजनांच्या मुख्य कालव्याची खुदाई तसेच वितरिकांची काही कामे अपूर्ण आहेत. काही ठिकाणी मुख्य कालव्याचे अस्तरीकरण सुरू आहे. नैसर्गिक आपत्ती आणि आवर्तन कालावधित ही कामे बंद राहिल्याने आता ठेकेदारांचीही कसरत होत आहे. आता ही सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करून उपवितरिकांऐवजी बंदिस्त पाईपलाईनमधून शेतीसाठी पाणी देण्याचे आव्हान आहे. या सर्व कामांना आता राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला पूर्णत्वास न्यावे लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणीgovernment schemeसरकारी योजना