निवृत्त हवालदार अण्णासाहेब गवाणे यांच्यासह त्यांचा मुलगा महेश व पत्नी मालती गवाणे यांनी दहा दिवसांपूर्वी घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली हाेती. महेश गव्हाणे याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ८४ लाख रुपये वसुलीसाठी सांगली, मिरज, रायबाग, हारुगिरी येथील १४ जणांनी तगादा लावल्याने तिघे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी १४ जणांविरुद्ध सावकारी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संतोष मंगसुळी या एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. इतर १३ पैकी अमित कुमार कांबळे, प्रवीण बनसोडे, पूजा शिंगाडे, शैलेंद्र शिंदे (रा. मिरज) या चाैघांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने चाैघांना अंतरिम अटकपूर्व जामीन दिला आहे. गुन्हा दाखल असलेल्या इतर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गव्हाणे कुटुंबाच्या आत्महत्येप्रकरणी चाैघांना अंतरिम अटकपूर्व जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST