बोगस नंबरप्लेट लावून मोटारी विकणाऱ्या चाैघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST2021-02-14T04:25:46+5:302021-02-14T04:25:46+5:30
सचिन तमन्ना रामगोंडावरू (वय २७, रा. पांडेगाव रोड, कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ), अभय पवार (रा. पुणे), आनम सिद्धीकी (रा. पनवेल) ...

बोगस नंबरप्लेट लावून मोटारी विकणाऱ्या चाैघांना अटक
सचिन तमन्ना रामगोंडावरू (वय २७, रा. पांडेगाव रोड, कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ), अभय पवार (रा. पुणे), आनम सिद्धीकी (रा. पनवेल) व अभिजित सावंत (रा. कोल्हापूर) या चाैघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी बीएस ४ इंजिनच्या मोटारी विक्रीस बंदी घातली आहे. यामुळे नोंदणी होत नसल्याने भंगारात विक्री झालेल्या बीएस ४ इंजिनच्या नवीन मोटारी चौघांनी विकत घेतल्या. या मोटारी पुराच्या पाण्यात खराब झाल्याचे सांगून बनावट नंबरप्लेटद्वारे पासिंग झाल्याचे भासवून दहा लाख रुपये किमतीच्या दोन मोटारी विक्री करणार होते. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला माहिती मिळाल्याने मिरजेत सापळा लावून चाैघांना अटक केली. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेल्या दोन मोटारी जप्त करून शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद आहे.