जतमध्ये बांधकाम सभापतीसह चाैघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST2021-02-23T04:41:16+5:302021-02-23T04:41:16+5:30
जत : जत शहरातील दोन गटात किरकोळ कारणावरून काठी व दगडाने मारामारी झाली. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या ...

जतमध्ये बांधकाम सभापतीसह चाैघांना अटक
जत : जत शहरातील दोन गटात किरकोळ कारणावरून काठी व दगडाने मारामारी झाली. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान शिवाजी चौक येथे घडली आहे. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल असून, बारा जणांच्या विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल आहे. यात जत नगर परिषदेच्या बांधकाम सभापतीसह चाैघांना अटक झाली आहे.
जत नगर परिषद बांधकाम समिती सभापती नामदेव काळे, राहुल काळे, सुरेश साठे व साजिद पखाली अशी त्यांची नावे आहेत. अभिषेक बाळू कांबळे (वय १८, रा. विठ्ठल नगर, जत) याने रोहन नामदेव काळे, राहुल काळे, नामदेव काळे, सज्जन मुल्ला, अविनाश जाधव, सुरेश उर्फ बिऱ्या साठे व इतर दोन ते तीन अनोळखी तरुणांच्या (सर्व रा. जत) विरोधात जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. रोहन नामदेव काळे (वय १७ रा. उमराणी रोड, जत) याने अभिषेक कांबळे, पंकज मोरे, पप्पू जाधव, साजीद पखाली, सौरभ ( पूर्ण नाव माहीत नाही ) व इतर दोन ते तीन अनोळखी यांच्या विरोधात जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
या मारामारी प्रकरणी दोन्ही गटातील चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना जत येथील न्यायालयात उभे केले असता २२ फेब्रुवारी अखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुढील तपास जत पोलीस करत आहेत.