मध्य रेल्वेची ४०.८५ दशलक्ष टन मालवाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:26 IST2020-12-22T04:26:21+5:302020-12-22T04:26:21+5:30
रेल्वेकडून लॉकडाऊन व अनलॉकच्या काळात देशभरात रेल्वे गाड्या चालवून कृषी, औद्योगिक मालवाहतूक करण्यात आली. मध्य रेल्वेने दोन लाख ...

मध्य रेल्वेची ४०.८५ दशलक्ष टन मालवाहतूक
रेल्वेकडून लॉकडाऊन व अनलॉकच्या काळात देशभरात रेल्वे गाड्या चालवून कृषी, औद्योगिक मालवाहतूक करण्यात आली.
मध्य रेल्वेने दोन लाख ९९ हजार वॅगन्स कोळसा, दोन लाख तीन हजार २२ वॅगन्स कंटेनर, पाच लाख ३४ हजार ५६६ वॅगन्स सिमेंट, ६७ वॅगन्स अन्नधान्य, तीन लाख ६५ हजार ४२२ वॅगन्स खत, ४२ हजार २४४ वॅगन्स पेट्रोल, तेल आणि वंगण, एक हजार ६६६ वॅगन्स लोह व पोलादाची वाहतूक केली.
एक लाख ७६ हजार टन पार्सल वाहतुकीमध्ये औषधे, फार्मा उत्पादने, ई-कॉमर्स वस्तू, मेल आणि इतर हार्ड पार्सल, दूध आदी आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. लॉकडाऊनपासून धावणाऱ्या ३०३ पार्सल गाड्यांमधून एक लाख ४४ हजार टन वाहतूक झाली. रेल्वेने तीन हजार ४४९ टन दुधाचीही वाहतूक केली आहे.