वांगी ग्रामपंचायतीस केंद्र सरकारचा पंचायत राज पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:11+5:302021-04-02T04:28:11+5:30

वांगी : वांगी (ता. कडेगाव) ग्रामपंचायतीस केंद्र सरकार व पंचायती राज मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत देण्यात येणारा प्रतिष्ठित ...

Central Government's Panchayat Raj Award for Wangi Gram Panchayat | वांगी ग्रामपंचायतीस केंद्र सरकारचा पंचायत राज पुरस्कार

वांगी ग्रामपंचायतीस केंद्र सरकारचा पंचायत राज पुरस्कार

वांगी :

वांगी (ता. कडेगाव) ग्रामपंचायतीस केंद्र सरकार व पंचायती राज मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत देण्यात येणारा प्रतिष्ठित असा पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार प्राप्त झाला आहे, अशी माहिती सरपंच डाॅ. विजय होनमाने यांनी दिली आहे.

ते म्हणाले, या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातून १७ ग्रामपंचायतीची तर आपल्या सांगली जिल्ह्यातून एकमेव वांगी ग्रामपंचायतीची निवड झालेली आहे. वांगी ग्रामपंचायतीने ई गवर्नेंस, केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निधीचे उत्तम व्यवस्थापन, इन्फॉरमेशन डिसक्लोजर, सामाजिक उत्तरदायित्व, अकाऊंट मेंटेनन्स, प्लॅनिंग व मीटिंग मॅनेजमेंट या विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच संजय कदम, बाबासाहेब सूर्यवंशी , राहुल साळुंखे, धनाजी सूर्यवंशी, काशीनाथ तांदळे, यशंवत कांबळे, रवींद्र कणसे, अंकुश माळी उपस्थित होते.

Web Title: Central Government's Panchayat Raj Award for Wangi Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.