शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध - खासदार संजय पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 16:21 IST

कडेगाव :  स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने प्रत्येक तालुकास्तरावर आरोग्यमेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी व दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी ...

कडेगाव :  स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने प्रत्येक तालुकास्तरावर आरोग्यमेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी व दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार संजय पाटील यांनी केले. आरोग्य मेळाव्यातून व  शिबारातून सर्वसामान्य  रुग्णांना फायदा होतो. या आरोग्य मेळाव्यातील लाभार्थीना  आयुष्यमान भारत योजना अंतर्गत ‘हेल्थ कार्ड’  देऊन या कार्डधारकांना नामांकित रुग्णालयात मोफत उपचार घेता येणार आहेत. नागरिकांनी या आरोग्य मेळाव्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही खासदार पाटील यांनी केले.स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त केंद्र सरकारतर्फे सुरू असलेल्या 'आझादी का अमृत महोत्सव' कार्यक्रमामार्फत चिंचणी (वांगी) ग्रामीण रुग्णालयात आयोजित आरोग्य मेळाव्याचे आज, गुरुवारी खासदार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मोहनराव कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, चिंचणीच्या सरपंच मनीषा माने आदी उपस्थित होते.यावेळी आमदार मोहन कदम यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत चिंचणी ग्रामीण रुग्णालय हे ग्रामपंचायत स्तरावरील राज्यातील पहिले ग्रामीण रुग्णालय असल्याचे सांगितले व येथील डॉक्टर व  कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.संग्रामसिंह देशमुख म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वारंवार आरोग्य शिबिरे  घेतली, ‘दिव्यांग मित्र’ अभियान राबवले. जिल्ह्यात तब्बल ३४ हजार २६५ दिव्यांगांची नोंदणी झालेले हे  अभियान राज्यासाठी ‘मॉडेल’ बनले. त्याप्रमाणे या आरोग्य मेळाव्यातूनही सर्व सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणार आहेत.दरम्यान, कोरोना योद्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीHealthआरोग्य