कोरोना स्थितीच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST2021-04-09T04:29:02+5:302021-04-09T04:29:02+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक गुरुवारी सांगलीत दाखल झाले. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून परिस्थितीची माहिती घेतली ...

Center team to inspect Corona's condition | कोरोना स्थितीच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक दाखल

कोरोना स्थितीच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक दाखल

सांगली : जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक गुरुवारी सांगलीत दाखल झाले. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून परिस्थितीची माहिती घेतली जाणार आहे.

राज्यभरात केंद्राची ३० पथके कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत. त्यापैकी केंद्रीय साथरोग नियंत्रण संस्थेचे सहसंचालक प्रणयकुमार वर्मा गुरुवारी सकाळी सांगलीत दाखल झाले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे व साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. संतोष पाटील यांच्याकडून त्यांनी कोरोनाची प्राथमिक माहिती घेतली. सध्याची रुग्णसंख्या, आजवरची एकूण रुग्णसंख्या, लसीकरणातील प्रगती, कोविड सेंटर्सची संख्या आदींची माहिती घेतली. शुक्रवारी सकाळी पथकातील दुसरे सदस्य डॉ. ओम सांगलीत येणार आहेत. ते नागपूर एम्समध्ये प्राध्यापक आहेत. दुपारी त्यांची जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल. शनिवारीदेखील ते जिल्ह्यातच असून काही कोविड केंद्रांना भेट देण्याची शक्यता आहे. पाहणीचा अहवाल केंद्राला सादर करतील.

Web Title: Center team to inspect Corona's condition