केंद्राने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीबाबत विचार कारावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:24 IST2021-01-21T04:24:23+5:302021-01-21T04:24:23+5:30
शिराळा : निधीअभावी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने याबाबत सहानुभूतीने विचार कारावा, ...

केंद्राने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीबाबत विचार कारावा
शिराळा : निधीअभावी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने याबाबत सहानुभूतीने विचार कारावा, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
येथील शेतकरी बचत भवनामध्ये जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत समिती शिराळामार्फत महाआवास अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा पार पडली, यावेळी ते बोलत होते.
आमदार नाईक म्हणाले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना ताकद दिली. या माध्यमातून अनेक नेतृत्वं पुढे आली आणी त्यांनी देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. आज जिल्हा परिषदा व पंचायत समित्या या दोन्ही घटकांकडे निधीची उपलब्धता अत्यंत कमी प्रमाणात होत आहे.
सहायक गटविकास अधिकारी ए. एस. माने यांनी स्वागत केले. उपसभापती बी. के. नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार नाईक यांच्या हस्ते तालुक्यातील ज्या वृद्ध कलाकारांना मानधन मंजूर झाले आहे, त्यांचा सत्कार झाला. जिल्हा परिषद सदस्य अश्विनी नाईक, सभापती वैशाली माने, सम्राटसिंग नाईक, माया कांबळे, संगीता गुरव, सारिका पाटील, विश्वास पाटील, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.
फोटो-२०शिराळा२
फोटो ओळी : शिराळा येथे महाआवास अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेत आमदार मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केले.