जागतिक रेड क्राॅस दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:53+5:302021-05-09T04:27:53+5:30
मिरज : मिरजेतील वसंतदादा पाटील रक्तपेढीत जागतिक रेड क्राॅस दिनानिमित्त हेन्री डुनान्ट यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष ...

जागतिक रेड क्राॅस दिन साजरा
मिरज : मिरजेतील वसंतदादा पाटील रक्तपेढीत जागतिक रेड क्राॅस दिनानिमित्त हेन्री डुनान्ट यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. जे. एन. भोमाज यांनी रेड क्राॅस सोसायटीचे संस्थापक हेन्री डुनान्ट यांच्या प्रतिमेचे पूजन करून रेड क्राॅस सोसायटीच्या जगातील दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. जे. एन. भोमाज, सचिव श्रीधर बेडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एम. मुजावर, डाॅ. आनंद यादव यांच्यासह तंत्रज्ञ, कर्मचारी उपस्थित होते.