नॅब अंधशाळेतर्फे दिव्यांग दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:28 IST2020-12-06T04:28:35+5:302020-12-06T04:28:35+5:30

अंधशाळेचे अनेक माजी विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे आहेत. त्यापैकी युनियन बँकेच्या मिरज शाखेत नियुक्ती झालेल्या सोनाली पाखरे ...

Celebrated Divyang Day by NAB Blind School | नॅब अंधशाळेतर्फे दिव्यांग दिन साजरा

नॅब अंधशाळेतर्फे दिव्यांग दिन साजरा

अंधशाळेचे अनेक माजी विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे आहेत. त्यापैकी युनियन बँकेच्या मिरज शाखेत नियुक्ती झालेल्या सोनाली पाखरे व दीपक बोळाज यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ. रा. न. पाठक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. युनियन बँकेचे शाखाधिकारी एस. के. जाधव व बँकेचे माजी अधिकारी सुधीर नाईक, अंधशाळेचे पदाधिकारी विष्णू तुळपुळे, नॅबचे राजेंद्र भोरे, अंधशाळेचे विशेष शिक्षक कुचेकर, शिक्षिका उज्वला हिरेकुडी, संगीत शिक्षिका वृंदा सातपुते उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिघ्र निदान व उपचार केंद्रातील दोन विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यांत आला.

फाेटाे : ०५ मिरज १

ओळ : मिरज येथे नॅब अंधशाळेत सोनाली पाखरे हिचा सत्कार डॉ. रा. न. पाठक, सुधीर नाईक, विष्णू तुळपुळे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी उज्ज्वला हिरेकुडी, वृंदा सातपुते, शाखाधिकारी एस. के. जाधव उपस्थित हाेते.

Web Title: Celebrated Divyang Day by NAB Blind School