‘कर्मवीर’मध्ये वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST2021-06-25T04:20:05+5:302021-06-25T04:20:05+5:30
इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी सीमंतिनी पाटील, उज्ज्वला जाधव, समिता पाडवी, ...

‘कर्मवीर’मध्ये वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी
इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी सीमंतिनी पाटील, उज्ज्वला जाधव, समिता पाडवी, सुज्ञानी चौगुले, प्राचार्य डॉ. ए. बी. पाटील, एस. बी. पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : पुरोगामी विचारांचा वारसा जोपासताना परिसरातील सामाजिक चळवळीचे ऊर्जास्थान असणाऱ्या येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्राध्यापिकांनी वृक्षारोपण करून वटपौर्णिमेचा सण साजरा केला. यावेळी उपस्थित सर्वांनी एक तरी झाड जगवेन, अशी शपथ घेतली.
या महाविद्यालयात सर्व उत्सव, वैज्ञानिक दृष्टिकोनासह नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. वटपौर्णिमेनिमित्त वडाला फेरी घेण्याऐवजी महिला शिक्षकांनी निसर्ग संवर्धनाचा दृष्टिकोन समोर ठेवून आवारात ठिकठिकाणी वृक्षारोपण केले. याप्रसंगी एक तरी झाड जगवावे, अशी शपथ घेण्यात आली.
महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून वनसंवर्धन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्राचार्य डॉ. ए. बी. पाटील यांनी केले.
यावेळी पर्यवेक्षक एस. बी. पाटील, पी. एच. पाटील, एकनाथ पाटील, सीमंतिनी पाटील, उज्ज्वला जाधव, समिता पाडवी, सुज्ञानी चौगुले, जे. व्ही. कथलकर, योगिता देसाई, रूपाली ऐकल, साक्षी चव्हाण उपस्थित होत्या.