नेर्ले येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:53+5:302021-02-05T07:20:53+5:30
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे ...

नेर्ले येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मतदारांना प्रतिज्ञा म्हणून शपथ देण्यात आली.
यावेळी मतदारांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवून निवडणुकांचे पावित्र्य राखू ,धर्म वंश, जात, समाज, भाषा यांच्या प्रभावाखाली न येता कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे नियोजन तलाठी पंडित चव्हाण यांनी केले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संगीता पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे, सरपंच छायाताई रोकडे, ग्रामविकास अधिकारी एम.डी. चव्हाण, माजी सरपंच संभाजी पाटील, उपसरपंच विश्वास पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, शरद बल्लाळ, आशासेविका, नागरिक उपस्थित होते.
फोटो -२५०१२०२१-आयएसएलएम-नेर्ले मतदार दिवस न्यूज
नेर्ले (ता. वाळवा) येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये उपस्थितांनी शपथ घेतली. यावेळी गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद सदस्य संगीता पाटील, सरपंच छायाताई रोकडे उपस्थित होत्या.