अहिल्यादेवींची जयंती साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:46+5:302021-06-01T04:19:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. महापालिका क्षेत्रात ...

Celebrate Ahilya Devi's birthday with simplicity | अहिल्यादेवींची जयंती साधेपणाने साजरी

अहिल्यादेवींची जयंती साधेपणाने साजरी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. महापालिका क्षेत्रात विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले.

पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक जयंती महोत्सव मंडळातर्फे संजयनगर-शिंदेमळा येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेसचे नगरसेवक मनोज सरगर, जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्ष महादेव सरगर, रासपचे सुरेश टेंगले, विशालदादा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अवधूत पाटील, अहिल्यादेवी मालवाहतूक असोसिएशनचे प्रदीप सांगोलकर, विकास गोयकर, संतोष कांबळे, आनंद सरगर, विकास गलांडे उपस्थित होते. यानिमित्ताने महापालिका क्षेत्रात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना विशालदादा पाटील युवा प्रतिष्ठान आणि सांगली फ्रेंडस सर्कलतर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

Web Title: Celebrate Ahilya Devi's birthday with simplicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.