कोल्हापूरच्या चौकाचौकात लवकरच सीसीटीव्ही : पाटील

By Admin | Updated: August 29, 2014 23:40 IST2014-08-29T23:40:13+5:302014-08-29T23:40:29+5:30

कावळा नाका येथे ट्रॅफिक बूथ)

CCTV soon in Chowk of Kolhapur: Patil | कोल्हापूरच्या चौकाचौकात लवकरच सीसीटीव्ही : पाटील

कोल्हापूरच्या चौकाचौकात लवकरच सीसीटीव्ही : पाटील

कोल्हापूर : शहरातील प्रमुख चौकांत लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी निधी मंजूर झाला असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज, शुक्रवारी केले. कावळा नाका येथे स्कायटेक इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमार्फत उभ्या करण्यात आलेला पोलीस मनोऱ्याच्या (ट्रॅफिक बूथ) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापालिका स्थायी समिती ठरावाने त्याला मंजुरी दिली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, उपमहापौर मोहन गोंजारे, शहर वाहतूक नियंत्रण
शाखेचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, स्कायटेक कंपनीचे अजित माणकापुरे, सन्मती पाटील व मिलिंद चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा म्हणाले की, सर्वच ठिकाणी असे ट्रॅफिक बूथ उभे राहिल्यास मदत मिळेल.

Web Title: CCTV soon in Chowk of Kolhapur: Patil