जत शहरावर आता सीसीटीव्हीची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:56+5:302021-07-08T04:17:56+5:30
जत : जत शहरातील मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या खर्चासाठी शासकीय मंजुरी मिळाली आहे. त्याचे कामही सुरू झाले असून ...

जत शहरावर आता सीसीटीव्हीची करडी नजर
जत : जत शहरातील मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या खर्चासाठी शासकीय मंजुरी मिळाली आहे. त्याचे कामही सुरू झाले असून जत शहरातील मुख्य रस्त्यावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर राहणार आहे.
एकूण १० ते १२ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. शहरातील जत-सांगली रोडवरील प्रांत कार्यालय, शिवाजी पेठ, संभाजी चौक असे तीन, विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर सोलनकर चौक, महाराणा प्रताप चौक, बसस्थानक बाहेर, मार्केट समिती गाळ्यांच्या पुढे तर बाजारपेठेतील गांधी चौक, वाचनालय चौक असे अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. शहराच्या मुख्य रस्त्यावर शासकीय कार्यालय,सराफ, व्यापारी बँका, हॉस्पिटल्स, किराणा, कापड, कृषी सेवा केंद्र अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. शहरातील वाढती रहदारी, वाहतुकीची होणारी कोंडी, ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ यामुळे जत शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत बेकायदेशीर कृत्य करणारे, मुलींची छेडछाड करणारे, बेदरकारपणे वाहन चालविणारे अशा यासारखे प्रकार आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंद होणार आहेत. वाहतुकीची कोंडी, चोरीची प्रकरणे, मुलींची छेडछाड अशा प्रकारास सीसीटीव्ही कॅमेरांमुळे लगाम बसण्यासाठी मदत होणार आहे. शहराला शिस्त मिळावी असून शहरात बेकायदेशीर कृत्य करणारे मुलींची छेडछाड बेदरकारपणे चालविणे यासारखे प्रकार वाहन सीसीटीव्ही आता कॅमेर्यात बंद होणार आहेत. वाहतुकीची कोंडी चोरीची प्रकरणे मुलींची छेडछाड अशा प्रकारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे लगाम लागणार आहे. सध्या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी फाउंडेशन करून त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. काही ठिकाणी ऑप्टिकल फायबर केबल जोडण्याचे काम सुरू केले आहे तर काही ठिकाणी केबल जोडणी झालेली नाही. त्यामुळे ही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी महिना ते दीड महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. जत शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आणल्यामुळे पोलीस प्रशासनासह सर्वसामान्य जनतेला ही मदत होणार आहे. व्यापारी शासकीय निमशासकीय कार्यालय आणि वाहनचालकांसह अनेकांची सोय होणार असल्याने या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.