शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'हप्ते व राजकीय पाठबळाने मिरज बनले 'कॅसिनो सिटी', २५ मिनिटांत लाखांचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 19:34 IST

'पुष्पा’ चित्रपटाप्रमाणे पोलिसांवर शिरजोरीचे प्रकार यापूर्वी मिरजेत घडले आहेत.

सांगली : पोलीसांची हप्तेखोरी व राजकीय पाठबळामुळे मिरज शहर कॅसिनो सिटी बनल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी केला.  सांगली आणि कुपवाडमध्येही क्लब वाढत आहेत. याविरोधात मारूती चौकातून आवाज उठविण्याचा इशारा त्यांनी पत्रकार बैठकीत दिला.पवार म्हणाले, आठ दिवसांत पोलिस व जिल्हा प्रशासनाने कारवाई केली नाहीतर रस्त्यावर उतरू. प्रसंगी न्यायालयात दाद मागू. मिरजेत आठवड्यापूर्वी अडीच कोटींचे चंदन पकडले गेले. त्यामुळे चंदन तस्करीची साखळी अजूनही कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जुगार अड्डयावर दोघांवर प्राणघातक हल्ला झाला. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करताना मारामारीचे ठिकाण व कारण बदलल्याची माहिती आहे. 

१५ वर्षांपूर्वीपर्यंत मिरज शहर चंदन आणि मानवी तस्करीचे केंद्र होते. सध्या पुन्हा एकदा कॅसिनो सिटी अशी ओळख बनली आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी शेतजमिनी दिलेल्या तरुण शेतकऱ्यांना भरपाईपोटी कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. त्यांना जुगार अड्डयांची भुरळ घातली जात आहे. त्यातून लूट केली जात आहे.पवार म्हणाले, तस्करी आणि जुगार क्लबना राजकीय पाठबळ आहे. हप्तेखोरी व राजकीय आशीर्वादाने गुन्हेगारी फोफावली आहे. सांगली व कुपवाडमध्येही त्याची लागण होत आहे. यामुळे महापालिका क्षेत्र गुन्हेगारांचे आगर होण्यास वेळ लागणार नाही. जुगार क्लबमधील हल्ल्याप्रकरणी आमच्याकडे काही तक्रारी आल्या आहेत. पोलिस आणि जिल्हा प्रशासन दबावाखाली वावरत आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाप्रमाणे पोलिसांवर शिरजोरीचे प्रकार यापूर्वी मिरजेत घडले आहेत.२५ मिनिटांत लाखांचा खेळपवार म्हणाले की, कॅसिनो क्लबमध्ये २५ मिनिटांत एक लाख रुपयांचा खेळ होतो. यातील १५ टक्के मालकाला मिळतात. त्यामुळे गुन्हेगारी फोफावली आहे. ती बंद करण्यासाठी पोलीसांना आठवडाभराची मुदत देत आहोत. महापालिका क्षेत्रातील अवैध धंदे बंद केले नाहीत, तर रस्त्यावरची लढाई सुरु करु.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरज