शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निधी घोटाळा: सांगली जिल्हा बँकेच्या निलंबित १३ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

By हणमंत पाटील | Updated: June 25, 2024 11:40 IST

सहा शाखांत दोन कोटी ४३ लाखांचा अपहार

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील दुष्काळ निधीमध्ये विविध ६ शाखांमध्ये एकूण २ कोटी ४३ लाखांचा घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणी संबंधित शाखेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. आता त्या १३ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी दुष्काळ निधी जमा होताे. मात्र, शेतकऱ्यांना याची कल्पना नव्हती. त्यामुळे हा निधी घेण्यासाठी संबंधित लाभार्थी बॅंंकेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे बसरगी, नेलकरंगी, तासगाव, निमणी, सिद्धेवाडी, हातनूर या ६ शाखेत एकूण दोन कोटी ४३ लाखांच्या निधीचा अपहार काही अधिकाऱ्यांसह कर्मचा-यांनी केला. मात्र, काही दिवसांनी हा घोटाळा उघडकीस आला.

जिल्हा बँकेचे संचालक मंडळाच्या आदेशानंतर पहिल्या टप्प्यात आठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर २१९ शाखांमध्ये जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून तपासणी मोहीम करण्यात आली. त्यानंतर दोषी आढळलेल्या आणखी काही कर्मचाऱ्यांवरही बँकेकडून तातडीने कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार १३ कर्मचाऱ्यांवर जिल्हा बँकेच्या प्रशासनाने संबंधित कर्मचारी काम करीत असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये अपहाराचे गुन्हे दाखल केले आहेत, असे वाघ यांनी सांगितले.

गुन्हा दाखल केलेले कर्मचारी..दुष्काळ निधी घोटाळा प्रकरणी प्रमोद कुंभार, योगेश वजरनीकर, मारुती हिले, संजय पाटील (तासगाव), अविनाश पाटील, अविनाश सूर्यवंशी, सुरेश कोळी (सिद्धेवाडी), विजय यादव (निमणी), बाळासो सावंत (पलूस), इंद्रजित वाघमारे (बसरगी), मच्छिंद्र म्हारगुडे, प्रतिक पवार व दिगंबर शिंदे (नेलकरंगी) या १३ कर्मचाऱ्यांवर अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस