इस्लामपुरात कुंडलच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST2021-07-19T04:18:26+5:302021-07-19T04:18:26+5:30

इस्लामपूर : सासरच्या लोकांनी माहेराहून पतीच्या व्यवसायाकरिता १० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याची ...

A case has been registered against six members of Kundal in Islampur | इस्लामपुरात कुंडलच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इस्लामपुरात कुंडलच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इस्लामपूर : सासरच्या लोकांनी माहेराहून पतीच्या व्यवसायाकरिता १० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार विवाहितेने पोलिसांत दिली आहे. या तक्रारीवरून कुंडल (ता. पलूस) येथील सासरच्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दीपा विक्रम लाड (वय ३२, मूळ रा. कुंडल, सध्या इस्लामपूर) या विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार युवराज विठ्ठल लाड, सुशीला युवराज लाड, उज्ज्वला जयंत कदम, आशा युवराज लाड, विकास युवराज लाड, विक्रम युवराज लाड, अशा सहा जणांविरुद्ध या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

जून १८ मध्ये दीपा आणि विक्रम यांचा विवाह झाला आहे. त्यानंतर महिनाभरातच सासरच्या मंडळींनी लग्नात मानपान केला नाही, या कारणावरून मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. माहेरच्या वडील आणि इतर नातेवाइकांनी समेटाचे प्रयत्न केले. मात्र, तरीही शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच होता. त्यामुळे विवाहितेने पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली.

Web Title: A case has been registered against six members of Kundal in Islampur