सांगलीवाडीजवळ घोडागाडी शर्यतप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:29 IST2021-08-23T04:29:32+5:302021-08-23T04:29:32+5:30
सांगली : सांगलीवाडीजवळ रविवारी पहाटे सहाच्या सुमारास बेकायदेशीरपणे आयोजित केेलेल्या घोडागाडी शर्यती पोलिसांनी रोखत २० अज्ञातांवर गुन्हा दाखल केला ...

सांगलीवाडीजवळ घोडागाडी शर्यतप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल
सांगली : सांगलीवाडीजवळ रविवारी पहाटे सहाच्या सुमारास बेकायदेशीरपणे आयोजित केेलेल्या घोडागाडी शर्यती पोलिसांनी रोखत २० अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन छकडा गाडी व दोन मोटारसायकली जप्त केल्या असून, दुचाकीवरून आता शर्यत आयोजन करणाऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सांगलीवाडी ते आष्टा मार्गावर रविवारी पहाटे सहा वाजता घोडागाडी शर्यतीचे आयोजन केले होते. यात सहभागी होण्यासाठी पाच घोडागाडी मालक त्या ठिकाणी पोहोचले होते. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने छापा टाकला. शर्यतीच्या ठिकाणी पोलीस येत असल्याचे पाहून शर्यतीत सहभागी स्पर्धक व आयोजकांनीही शर्यतीच्या ठिकाणाहून पळ काढला. या गडबडीत पोलिसांनी दोन छकडा गाडी व दोन दुचाकी जप्त केल्या व २० अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. आता दुचाकीवरून आयोजक व स्पर्धकांचा शोध घेतला जाणार आहे. पोलीस कर्मचारी अरुण जाधव यांनी फिर्याद दिली आहे.