आसिफ बावा याच्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:21 IST2021-06-02T04:21:19+5:302021-06-02T04:21:19+5:30

सांगली : कोरोनाबाधित असतानाही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आसिफ नबीलाल बावा(रा. खणभाग, सांगली) याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Case filed against Asif Bawa | आसिफ बावा याच्यावर गुन्हा दाखल

आसिफ बावा याच्यावर गुन्हा दाखल

सांगली : कोरोनाबाधित असतानाही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आसिफ नबीलाल बावा(रा. खणभाग, सांगली) याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दिलीप कृष्णा पाटील यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील खणभाग परिसरात दोघेजण भांडत असताना, त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसाने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी बावा याने येत जमाव जमवीत त्यातील एकाने महिला पोलिसास शिवीगाळ करत धक्काबुक्की केली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत बावा यास ताब्यात घेतल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले होते. यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली होती.

पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कोरोनाचे निदान झाले असतानाही बावा कोविड सेंटरपासून प्रयोगशाळेपर्यंत विनामास्क चालत गेला. कोरोनाचा संसर्ग होऊ नये असे सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले व जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचा भंग केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Case filed against Asif Bawa