मिरजेतील ॲपेक्सकेअर कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल २०५ पैकी तब्बल ८७ रुग्णांच्या मृत्यू झाल्याने रुग्णालयचालक डॉ. महेश जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यासह अन्य दोन डाॅक्टर, रुग्णालयातील लेखापाल, वॉर्डबॉय, परिचारिका, औषध दुकानदार व रुग्णवाहिका चालक अशा १६ जणांना अटक झाली आहे. डॉ. जाधव याला मदत केल्याबद्दल सांगलीतील एमडी डॉक्टर शैलेश बरफे याचे नाव निष्पन्न झाल्याने पोलीस त्याच्या शोधात होते. मात्र डाॅ. बरफे याने जिल्हा सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. दोन्ही न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो फरारी झाला होता.
सोमवारी गांधी चौक पोलिसांनी त्यास अटक केली. त्याच्याकडून आणखी काही माहिती उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.