कुपवाडला गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:32 IST2021-09-04T04:32:20+5:302021-09-04T04:32:20+5:30
कुपवाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुपवाड शहर परिसरातील गणेश मंडळांनी आरोग्यविषयक उपक्रम राबवावेत, तसेच जमा देणगी सामाजिक कामासाठी वापरण्याबरोबरच ...

कुपवाडला गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम राबवा
कुपवाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुपवाड शहर परिसरातील गणेश मंडळांनी आरोग्यविषयक उपक्रम राबवावेत, तसेच जमा देणगी सामाजिक कामासाठी वापरण्याबरोबरच स्वच्छतेस आणि जनजागृतीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी केले.
कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजित गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. पाटील म्हणाले की, यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी शांततेत साजरा करावा. गणेशोत्सवासाठी मनपाचे सर्व परवाने बंधनकारक आहेत. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव होणार नाही. उत्सव मिरवणुका होणार नाहीत. ध्वनिक्षेपक, डॉल्बी यासह इतर वाद्यांना बंदी असेल. मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन करू नये.
ते म्हणाले, एक गाव एक गणपतीप्रमाणे एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न करावा. आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मदत करावी. आरतीसाठी पाच जणांचीच उपस्थिती बंधनकारक आहे. लोकांनी गर्दी न करता सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा.
यावेळी प्रभाग समिती तीनचे सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड, उपनिरीक्षक तुषार काळेल, एम. व्ही. जठार, प्रद्यावंत कांबळे, सिद्धांत ठोकळे, विकास कांबळे यांच्यासह सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.