बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना आता चाप बसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST2021-09-02T04:57:27+5:302021-09-02T04:57:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याबरोबरच बेदरकारपणे वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई होत असते. ...

बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना आता चाप बसणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याबरोबरच बेदरकारपणे वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई होत असते. ही कारवाई अधिक सक्षमपणे होण्यासाठी आता आरटीओकडे अत्याधुनिक वाहन दाखल झाले आहे. वेगाची मर्यादा नाेंदविणारे स्पीड गन, ब्रेथ ॲनालायझरसह वाहनांच्या काचेवरील फिल्मिंगची तपासणी करणारी यंत्रणा या वाहनात असणार असून जिल्हाभर भरारी पथकाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.
वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अपघातांची संख्या वाढत असते. त्यामुळे जिल्हाभरात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. या कारवाईसाठी नुकतेच राज्य शासनाकडून सर्व जिल्ह्यांना अत्याधुनिक वाहन देण्यात आले आहे. सांगली कार्यालयासही हे वाहन मिळाले असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांच्याहस्ते वाहन पथकाकडे प्रदान करण्यात आले. या वाहनात स्पीडगन असणार असून मार्गावर निर्धारित केलेला वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनावर याद्वारे दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या कारवाईसाठी ब्रेथ ॲनालायझरचीही सोय असणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन आरटीओ कांबळे यांनी केले आहे.