शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बागलकोटजवळ टायर फुटल्याने गाडी उलटून अपघात, बाप लेकांचा जागेवर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 13:31 IST

शिरूर- बागलकोट ( कर्नाटक राज्य) येथे तवेरा गाडीचे पुढील दोन्ही टायर फुटल्याने गाडी उलटून  झालेल्या अपघातात दस्तगिर सिकंदर पन्हाळकर (वय ४८) व सिकंदर उमर पन्हाळकर ( वय ७२, दोघे रा.शिराळा, जिल्हा सांगली) या बाप लेकांचा जागेवर मृत्यू झाला.  गुरुवार दि. ४ रोजी पहाटे ३ च्या दरम्यान अपघात घडला. या घटनेमुळे शिराळा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देबागलकोटजवळ टायर फुटल्याने गाडी उलटून अपघातशिराळा बाप लेकांचा जागेवर मृत्यू

शिराळा :  शिरूर- बागलकोट ( कर्नाटक राज्य) येथे तवेरा गाडीचे पुढील दोन्ही टायर फुटल्याने गाडी उलटून  झालेल्या अपघातात दस्तगिर सिकंदर पन्हाळकर (वय ४८) व सिकंदर उमर पन्हाळकर ( वय ७२, दोघे रा.शिराळा, जिल्हा सांगली) या बाप लेकांचा जागेवर मृत्यू झाला.  गुरुवार दि. ४ रोजी पहाटे ३ च्या दरम्यान अपघात घडला. या घटनेमुळे शिराळा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत माहिती अशी की , गेल्या चार वर्षांपासून सिकंदर पन्हाळकर यांना ब्रेन हँमरेज हा आजार होता. त्यामुळे त्याना उपचारासाठी आंध्रप्रदेश मधील गंदवाल- रायचूर येथे नेत असत. बुधवार दि.३ रोजी रात्री ९ च्या दरम्यान स्वतःची तवेरा गाडी( क्रमांक एम एच ०४ सि बी ७१४७) मधून चालक अस्लम इब्राहिम नदाफ (वय ३६) यांचेसह सिकंदर पन्हाळकर, त्यांची दोन मुले दस्तगिर पन्हाळकर व अबू बक्कर पन्हाळकर (वय ४२) , नातू इक्लास अबूबक्कर पन्हाळकर ( वय १८ ) असे पाच जण गंदवाल येथे उपचारासाठी निघाले होते.बागलकोट पासून १५ किमी अंतरावरील शिरूर गावाजवळ गाडीचे पुढील दोन्ही टायर अचानक फुटल्याने गाडी उलटी झाली. यामुळे सिकंदर पन्हाळकर , दस्तगिर पन्हाळकर यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक अस्लम नदाफ, अबू बक्कर पन्हाळकर , इक्लास पन्हाळकर हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती समजताच शिराळा येथून नातेवाईक व मित्रमंडळी यांनी बागलकोट शिरूर घटनास्थळी धाव घेतली.पन्हाळकर यांचा फर्निचर विक्रीचे शिराळा येथे दुकान आहे.

रस्त्यातच जेवणपन्हाळकर कुटुंबीय रात्री ९ च्या दरम्यान घरातून जेवणाचे डबे घेऊन बाहेर पडले. त्यानी रस्त्यातच जेवण केले.

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगली