शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘जुगाड जिप्सी’ची आनंद महिंद्रांकडून दखल, बुलेरोची दिली ऑफर; दत्तात्रय लोहारांनी मानले आभार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 19:21 IST

महिंद्रा कंपनीची सांगली येथील टीम लोहार यांच्या घरी उद्या भेट देणार आहे व गाडीची पाहणी करणार आहेत अशी माहिती दत्तात्रेय लोहार यांनी दिली.

देवराष्टे : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील देवराष्टे येथील दत्तात्रय लोहार यांनी एक भन्नाट चार चाकी बनवली आहे. भंगार आणि दुचाकीच्या भागांपासून बनवलेल्या या कारच्या प्रयोगाचे 'दैनिक लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशित केले होते. तर या कारच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. यानंतर लोहार यांनी बनवलेल्या या कारची दखल चक्क महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी घेतली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लोहार यांच्या वाहनाचा व्हिडिओ शेअर केला असून त्यांना बोलेरो कारची ऑफर देखील दिली आहे.उद्योगपती आनंद महिंद्रा हे तत्रज्ञान क्षेत्रात काही विविध नाविन्य प्रयोग करणाऱ्या लोकांची नेहमीच दखल घेत असतात. त्यांचे ट्विटरवरून कौतुक करत त्यांच्या पाठिवर थाप देतात. इतकेच नाही तर असे प्रयोग करणाऱ्या किंवा देशाचे नाव उज्वल करणाऱ्यांना त्यांनी भेट म्हणून कार देवू केल्या आहेत. दत्तात्रय लोहार यांना अशीच कौतुकांची थाप त्यांनी बोलेरो कारची ऑफर दिली आहे.त्यांनी केलेल्या ट्विटरमध्ये म्हटले आहे की, हे वाहन नियमांचे उल्लंघन करत असल्याने स्थानिक अधिकारी लवकर किंवा नंतर वाहनचालकाला ते चालवण्यास थांबवतील. मी त्याला वैयक्तिकरित्या त्याच्या वाहनाच्या बदल्यात बोलेरो ऑफर करेन. आम्हाला प्रेरणा देण्यासाठी त्याची निर्मिती महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये प्रदर्शित केली जाऊ शकते. कारण संसाधनसंपन्न म्हणजे कमी संसाधनांत अधिक करणे होय असे म्हटले आहे.

दत्तात्रेय लोहार यांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद आनंद महिंद्रा यांनी दिलेल्या ऑफर चे आभार मानले आहे. तसेच उद्या, गुरुवार (दि.२३) रोजी सांगली येथील टीम लोहार यांच्या घरी भेट देणार आहे व गाडीची पाहणी करणार आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.लोहार यांचे फॅब्रिकेशनचे छोटेसे वर्कशॉप व थोडी शेती आहे. सध्या सर्वांनाच घरी चारचाकी असावी असे वाटते; तसे दत्तात्रय यांनाही वाटत होते. परंतु बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे गाडी घेणे शक्य नव्हते. या परिस्थितीपुढे न झुकता स्वतः गाडी तयार करण्याचे त्यांनी ठरवले आणि सुरुवात केली.भन्नाट जुळवाजुळव फॅब्रिकेशनच्या वर्कशॉपमध्ये भंगारात पडलेल्या दुचाकी गाडीचे इंजिन व जीपचे बोनेट, रिक्षाची चाके अशी भन्नाट जुळवाजुळव करून त्यांनी टुमदार चारचाकी गाडी तयार केली. ती आकाराने नॅनो गाडीपेक्षा लहान असून, प्रतिलिटर ४० ते ४५ किलोमीटर जाते. ताशी पन्नास किलोमीटर वेगाने धावते. एका वेळेस चार माणसे बसून प्रवास करू शकतात. ही गाडी बनवण्यासाठी सुमारे साठ हजार रुपयांचा खर्च आला. दुचाकीसारखी मारावी लागते किक गाडी सुरू करण्यासाठी बटन-स्टार्टरचा वापर न करता दुचाकीसारखी किक मारावी लागते. शिवाय इतर मोटारींप्रमाणे स्टेअरिंग उजव्या बाजूऐवजी डाव्या बाजूस बसवले आहे. ही अफलातून गाडी तयार करण्यासाठी त्यांना दोन महिन्यांचा कालावधी लागला. दत्तात्रय लोहार अल्पशिक्षित मात्र..दत्तात्रय लोहार अल्पशिक्षित असून त्यांनी कोणतीही पदवी घेतलेली नाही. मात्र प्रबळ इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही. हे त्यांनी सिद्ध केले आहे.पवनचक्की, भांगलण यंत्राचाही प्रयोगदत्तात्रय यांच्या मुलाने घरी चारचाकी असावी, अशी इच्छा व्यक्त होती. यातून ही कल्पना सुचली व दोन वर्षांपासून जुन्या सुट्या भागांची साठवणूक करून दोन महिन्यांत जुगाड जिप्सी तयार केली. यापूर्वी त्यांनी पवनचक्की आणि भांगलणीसाठी यंत्र तयार केले होते.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रAnand Mahindraआनंद महिंद्राcarकार