मृत प्रेयसीच्या अंगावरील दागिने हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:26 IST2021-04-15T04:26:29+5:302021-04-15T04:26:29+5:30

इस्लामपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथील प्रेयसीचा डोक्यात दगड घालून खून केल्यानंतर प्रियकराने तिच्या अंगावरील काढून घेतलेले मंगळसूत्र आणि ...

Captured jewelry on the body of a dead sweetheart | मृत प्रेयसीच्या अंगावरील दागिने हस्तगत

मृत प्रेयसीच्या अंगावरील दागिने हस्तगत

इस्लामपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथील प्रेयसीचा डोक्यात दगड घालून खून केल्यानंतर प्रियकराने तिच्या अंगावरील काढून घेतलेले मंगळसूत्र आणि पायातील जोडवे पोलिसांनी आज हस्तगत केले. २ एप्रिलच्या मध्यरात्री खुनाची ही घटना घडली होती. हा प्रकार ९ एप्रिल रोजी उघडकीस आला.

मंगल पांडुरंग गुुरव (वय ४६, रा. नेर्ले) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. या खूनप्रकरणी कापूूसखेड येथील प्रियकर अशोक पांडुरंग डेळेकर (वय ४६) हा सध्या पोलीस कोठडीत आहे. मंगल गुरवने ५० हजार रुपये मागितल्यानंतर झालेल्या वादातून डेळेकर याने तिच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगड घालून तिचा खून केला. यानंतर त्याने तिच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र आणि पायातील चांदीचे जोडवे काढून घेतले होते. पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करीत आहेत. या चौकशीदरम्यान त्याने मृत मंगलच्या अंगावरील दागिने काढून घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या पथकाने डेळेकर याने लपवून ठेवलेले दागिने हस्तगत केले.

Web Title: Captured jewelry on the body of a dead sweetheart