शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत अपघातात निवृत्त कॅप्टन ठार, एकजण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 14:56 IST

भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील (वय ६७, रा. सांगलीवाडी) हे जागीच ठार झाले. ते भारतीय सैन्य दलातून कॅप्टन म्हणून निवृत्त झाले होते.

ठळक मुद्दे सांगलीत अपघातात निवृत्त कॅप्टन ठार, एकजण गंभीर चिंतामणनगर रेल्वे पुलावर मोटारीची धडक

सांगली : भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील (वय ६७, रा. सांगलीवाडी) हे जागीच ठार झाले. ते भारतीय सैन्य दलातून कॅप्टन म्हणून निवृत्त झाले होते.

या अपघातात त्यांचे मित्र सुरेश तातोबा कांबळे (५५, कवठेपिरान, ता. मिरज) हे गंभीर जखमी झाले आहेत. माधवनगर रस्त्यावरील चिंताणीनगर रेल्वे पुलावर मंगळवारी सकाळी नऊ वाजता हा अपघात झाला.ज्ञानेश्वर पाटील भारतीय सैन्य दलातून २० वर्षापूर्वी निवृत्त झाले आहेत. सांगलीत गणपती मंदिरात त्यांनी काही वर्षे सुरक्षारक्षक प्रमुख म्हणून काम केले होते. तीन वर्षापूर्वी त्यांनी हे काम बंद केले होते.

विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याशी त्यांचे जवळीकचे संबंध होते. त्यांचे मित्र सुरेश कांबळे गणपती मंदिरात सुरक्षारक्षक आहेत. विजयसिंहराजे पटवर्धन सोमवारी सांगलीत आले होते. माधवनगर रस्त्यावरील माळबंगल्यावरील निवास्थानात ते मुक्कामी आहेत. त्यांना भेटण्यासाठी पाटील व कांबळे दुचाकीवरुन निघाले होते.

कांबळे दुचाकी चालवित होते, तर पाटील पाठीमागे बसले होते. चिंतामणीनगर पुलावरुन जात असताना माधवनगरहून सांगलीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारीने (क्र. एमएच ०९ ईयू १४३८) विरुद्ध बाजूला घेऊन त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये पाटील व कांबळे दुचाकीसह रस्त्यावर पडले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.मोटारीची धडक एवढी भीषण होती की, पुन्हा मोटार बायपास रस्त्यावर पाटील वाडा हॉटेलजवळ चिंचेच्या झाडावर जाऊन आदळली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या कांबळे यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. पण प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना टिंबर एरियातील खासगी रुग्णालयात हलविले आहे.

अपघाताचे वृत्त समजताच मृत पाटील व कांबळे यांंच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मोटारीच्या चालकास ताब्यात घेतले आहे.बहिणीला सोडलेमोटारीचा चालकाची बहिण कवलापूर (ता. मिरज) येथील वसंतदादा पाटील दंत महाविद्यालयात डॉक्टर आहे. बहिणीला सोडण्यासाठी तो महाविद्यालयात गेला होता. तिला सोडून परत सांगलीत येत असताना हा अपघात झाला.

मोटारीच्या चालक बाजूचे टायरमध्ये काहीच हवा नव्हती. कदाचित टायर फुटले असावे, असा संशय आहे. यातून हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. 

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात