झरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी, आंबेगाव व विहापूरचे कंटेनमेंट झोन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:16 PM2020-07-02T16:16:25+5:302020-07-02T16:19:27+5:30

सांगली  : जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी आणि  कडेगाव तालुक्यातील आंबेगाव व विहापूर येथील प्रतिबंधित क्षेत्राचे 28 दिवस 28 ...

Cantonment zones of Jhare, Kargani, Shetphale, Lengrewadi, Ambegaon and Vihapur canceled | झरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी, आंबेगाव व विहापूरचे कंटेनमेंट झोन रद्द

झरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी, आंबेगाव व विहापूरचे कंटेनमेंट झोन रद्द

googlenewsNext
ठळक मुद्देझरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी, आंबेगाव व विहापूरचे कंटेनमेंट झोन रद्दजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आदेश

सांगली : जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी आणि  कडेगाव तालुक्यातील आंबेगाव व विहापूर येथील प्रतिबंधित क्षेत्राचे 28 दिवस 28 जून रोजी पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रासाठी जारी केलेली दि. 27 मे रोजीच्या कंटेनमेंट झोनची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी  दि. 2 जुलै रोजी रद्द केल्या असून या अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत.

आटपाडी तालुक्यातील झरे, करगणी, शेटफळे व लेंगरेवाडी आणि  कडेगाव तालुक्यातील आंबेगाव व विहापूर हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आले होते. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते.

आटपाडी तालुक्यातील क्षेत्रात शेवटचा बाधित रूग्ण दि. 4 जून रोजी निदर्शनास आले असून तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. या झोनचे 28 दिवस 2 जुलै रोजी पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी जारी केलेल्या अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. 3 जुलै 2020 पासून करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

कडेगाव तालुक्यातील आंबेगाव व विहापूर 

कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते.

आंबेगाव येथील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शेवटचा बाधित रूग्ण दि. 27 मे रोजी निदर्शनास आला असून तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. सदर झोनचे 28 दिवस 25 जून रोजी पूर्ण झाले आहेत. तर विहापूर येथील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शेवटचा बाधित रूग्ण दि. 1 जून रोजी निदर्शनास आला असून तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही.

प्रतिबंधित क्षेत्राचे 28 दिवस 28 जून रोजी पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सदर दोन्ही क्षेत्रासाठी जारी केलेली दि. 27 मे रोजीच्या अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी
डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 2 जुलै रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

Web Title: Cantonment zones of Jhare, Kargani, Shetphale, Lengrewadi, Ambegaon and Vihapur canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.