शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: सर्वच पक्षांच्या उमेदवारांना सतावतेय क्रॉस वोटिंगची चिंता, मतविभाजन टाळण्यासाठी नेत्यांकडून बैठका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 14:10 IST

बहुतांश पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्यामुळे मतविभाजन होऊन त्याचा फटका नेमके कुणाला बसणार हे निकालानंतरच कळणार

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मंगळवारी जाहीर प्रचार संपणार असून, गुप्त रणनीती वाढणार आहेत. महापालिका निवडणुकीत महायुती नसल्याने क्रॉस वोटिंग आणि मतविभाजनाचा फटका उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. मतविभाजन टाळण्यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या बैठका घेऊन समज दिली जात आहे.महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) स्वतंत्रपणे लढत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी महाविकास आघाडी केली आहे. पण, उमेदवार पक्षाच्या चिन्हावरच लढत आहेत. वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज, उद्धवसेना, मनसे यांनीही काही प्रभागात उमेदवार उभे केले आहेत. बहुतांश पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्यामुळे मतविभाजन होऊन त्याचा फटका नेमके कुणाला बसणार हे निकालानंतरच कळणार आहे. सध्या अनेक प्रभागांत मतविभाजनाचे चित्र दिसत असल्यामुळे उमेदवारांनी याचा धसका घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा प्रारंभ केला, परंतु त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगलीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यासह स्थानिक नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली असली तरी प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती जाणवली. या निवडणुकीत क्रॉस मतदानाचा धोका मोठ्या प्रमाणात असल्याने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. महापालिकेत संमिश्र नगरसेवकांची निवड होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ७८ जागांसाठीच्या या निवडणुकीत ३८१ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, शिवसेना, उद्धव सेना, राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष, काँग्रेस अशा प्रमुख पक्षांमध्ये चुरस आहे. शिंदे सेना ७८ पैकी ६२ जागांवर लढत आहे आणि यामुळे कोणत्या पक्षाला फटका बसेल याचीच चर्चा रंगली आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांनी प्रचारात जोरदार भूमिका घेतली. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसा असंतोष जाणवतो आहे. सांगलीतील नेत्यांनी प्रचारात आक्रमक भूमिका घेतली असली तरी क्रॉस मतदानाची शक्यता आणि स्थानिक पातळीवर होणाऱ्या गोंधळामुळे नेमका कोण बाजी मारेल, हे सांगणे कठीण झाले आहे.

नात्यागोत्याच्या राजकारणामुळे क्रॉस वोटिंगमहापालिका निवडणूक ही वर वर पाहता पक्षांची लढाई असते; पण प्रत्यक्षात ती घराघरांत, नात्यांत आणि ओळखीत लढली जाते. त्यामुळेच या निवडणुकांत क्रॉस वोटिंगचे प्रमाण इतर निवडणुकांपेक्षा जास्त दिसते. एकाच प्रभागात एकाच कुटुंबातील आणि जवळच्या नात्यातील उमेदवार वेगवेगळ्या पक्षांतून उभे आहेत. प्रचाराच्या काळात मतदार पक्षाच्या झेंड्याखाली फिरत आहेत. पण मतदानाच्या वेळी मात्र “पक्ष नव्हे, आपला माणूस” हे समीकरण चालते. भाऊ, मेहुणा, पुतण्या, जावई, साडू यांच्यापैकी कोणी उमेदवार असेल, तर मतपेटीत बटण तिथेच दाबले जाते. हीच खरी क्रॉस वोटिंगची मुळे आहेत.

महापालिका निवडणुकीतील रिंगणातील उमेदवारभाजप - ७८शिंदे सेना - ६२काँग्रेस - ३१राष्ट्रवादी अजित पवार - ३२राष्ट्रवादी शरद पवार - १९शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - २९मनसे - ४वंचित - १२एमआयएम - ३समाजवादी पक्ष - ४रासप - ६जनसुराज्य पक्ष - ३बसप - ६जयहिंद सेना - १रिपब्लिकन सेना - १भाकप - १अपक्ष - ८९.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Election 2026: Cross-voting worries candidates, leaders hold meetings.

Web Summary : Sangli civic polls see parties fret over cross-voting due to independent contests. Leaders are holding meetings to prevent vote division, amidst concerns of a mixed mandate.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Votingमतदान