शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करा : संजय विभुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 14:34 IST

राष्ट्रवादी नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीचा भाजपने राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. दोन दिवसात पडळकरांनी माफी मागितली नाही, तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देमाफी न मागितल्यास शिवसेना आंदोलन करणारमहाराष्ट्रच्या राजकीय परंपरेला पडळकरांनी काळीमा फासला

सांगली : राष्ट्रवादी नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीचा भाजपने राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. दोन दिवसात पडळकरांनी माफी मागितली नाही, तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.ते म्हणाले की, शरद पवारांना कोरोना संबोधून पडळकरांनी महाराष्ट्रच्या राजकीय परंपरेला काळीमा फासला आहे. त्यांच्या वक्तव्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगीरी व्यक्त केली. भाजपचे अन्य नेतेसुद्धा या वक्तव्याशी सहमत नाहीत. त्यामुळे भाजपने केवळ दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी पडळकरांची आमदारकी काढून घेऊन त्यांची हकालपट्टी करावी. अशी कारवाई न झाल्यास भाजपसुद्धा या कटकारस्थानाचा भाग असल्याची महाराष्ट्राला खात्री पटेल. पडळकरांवर कारवाई झाल्यास खरोखर भाजप शिस्तप्रिय पक्ष आहे, हे आम्ही जाहीरपणे कबूल करू.शरद पवारांबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंढरपुरात न येण्याचा सल्ला देऊन मुंबईतील कोरोनाबाधितांच्या प्रमाणाचा उल्लेख पडळकरांनी करून त्यांचाही अवमान केला आहे. तेसुद्धा मुंबईतूनच आमदारकीची शपथ घेऊन पंढरपुरात आले होते. मागील दाराने आमदार होऊन समाजाची, विविध पक्षांशी गद्दारी करणाऱ्या पडळकरांची कोणाला सल्ला देण्याची लायकी नाही.

ज्या भाजपच्या नेत्यांना शिव्यांची लाखोली पडळकरांनी वाहिली त्याच पक्षाच्या वळचणीला ते गेले आहेत. भाजपच महाराष्ट्राला आणि देशाला लागलेला कोरोना असून सत्तेच्या मोहापायी हा पक्ष कोणत्याही थराला जात आहे. मानसिक रोगी बनून कोणतीही वक्तव्य भाजप नेते करीत आहेत, असे विभुते म्हणाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर, महेंद्र चंडाळे, मयुर घोडके, अमोल पाटील आदी उपस्थित होते.विठ्ठलाचे नाव घेऊ नका!ज्या पडळकरांनी बिरोबाची खोटी शपथ घेऊन एका देवाला फसविले त्यांनी आता विठ्ठलाचे नाव घेऊन दुसऱ्या देवाला फसवू नये. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांनी यायचे की नाही ते पंढरीचा विठ्ठल व भक्त ठरवतील. त्यामुळे पडळकरांनी आता विठ्ठलाच्या नावावर कोणाला सल्ले देऊ नयेत, असे विभुते व शंभोराज काटकर म्हणाले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSangliसांगलीShiv Senaशिवसेना