जैववैद्यकीय कचरा घंटागाडीत टाकल्याबद्दल केलेला दंड रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 06:17 PM2021-04-23T18:17:11+5:302021-04-23T18:25:40+5:30

Sangli Hospital : शहरातील शिंदे मळ्यातील अहिल्यादेवी होळकर चौकात असलेल्या दुदनकर मल्टी स्पेशालिटी सेंटरने मोठ्या प्रमाणावर जैव वैद्यकीय कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीत टाकल्याबद्दल दुदनकर हॉस्पिटलवर महापालिकेला  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे आणि स्वछता निरीक्षक अतुल आठवले यांनी एक लाख रुपये दंड केला होता, मात्र आयुक्तांच्या आदेशाने तो रद्द करून अवघे पंचवीस हजार रुपये वसुल करण्यात आले. 

Cancel fine for dumping biomedical waste | जैववैद्यकीय कचरा घंटागाडीत टाकल्याबद्दल केलेला दंड रद्द

शहरातील शिंदे मळ्यातील अहिल्यादेवी होळकर चौकात असलेल्या दुदनकर मल्टी स्पेशालिटी सेंटरने मोठ्या प्रमाणावर जैव वैद्यकीय कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीत टाकल्याबद्दल दुदनकर हॉस्पिटलवर महापालिकेला  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे आणि स्वछता निरीक्षक अतुल आठवले यांनी एक लाख रुपये दंड केला होता, मात्र आयुक्तांच्या आदेशाने तो रद्द करून अवघे पंचवीस हजार रुपये वसुल करण्यात आले. 

Next
ठळक मुद्दे जैववैद्यकीय कचरा घंटागाडीत टाकल्याबद्दल केलेला दंड रद्द आयुक्तांच्या आदेशाने अवघे पंचवीस हजार रुपये वसुल

संजयनगर/सांगली  : शहरातील शिंदे मळ्यातील अहिल्यादेवी होळकर चौकात असलेल्या दुदनकर मल्टी स्पेशालिटी सेंटरने मोठ्या प्रमाणावर जैव वैद्यकीय कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीत टाकल्याबद्दल दुदनकर हॉस्पिटलवर महापालिकेला  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे आणि स्वछता निरीक्षक अतुल आठवले यांनी एक लाख रुपये दंड केला होता, मात्र आयुक्तांच्या आदेशाने तो रद्द करून अवघे पंचवीस हजार रुपये वसुल करण्यात आले. 

गुरुवारी आयुक्त नितीन कापडणीस यांनी दुदनकर  हॉस्पिटलला भेट दिली व एक लाख रुपये दंड रद्द करुन फक्त पंचवीस हजार रुपये वसुल करण्यात आले. याबाबत नागरिकांच्यातुन उलटसुलट चर्चा आहे.

या भागामध्ये या हॉस्पिटलचा कचरा बाहेर टाकल्याबद्दल नागरिकांनी तक्रार केली, त्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली होती. यानंतर डॉक्टर महेश दुदनकर यांनी एक लाख रुपयाचा धनादेश स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांच्याकडे सुपूर्त केला होता. आता महापालिकेने पंचवीस हजार रुपयाचा दंड वसुल का केला याबाबत चर्चा आहे.

आयुक्त नितीन कापडणीस यांनी गुरुवारी दुदनकर हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर या हॉस्पिटलला पंचवीस हजार रुपये दंड करण्यात आला. ही 75 हजार रुपयाची माफी का देण्यात आली, नेमकं कोण कोणाच्या दबावाला बळी पडले याबाबत माहिती मिळाली पाहिजे. 

- समीर बारवाले, युवा नेते.

Web Title: Cancel fine for dumping biomedical waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.