आयुष संस्थेतर्फे दिव्यांगांसाठी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST2021-09-25T04:28:39+5:302021-09-25T04:28:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विस्टियॉन टेक्निकल अँड इंडिया आणि आयुष सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी नवीन तंत्रज्ञानाने ...

आयुष संस्थेतर्फे दिव्यांगांसाठी शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विस्टियॉन टेक्निकल अँड इंडिया आणि आयुष सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी नवीन तंत्रज्ञानाने बनवलेले पाय मोफत बसविण्यासाठी त्यांचे मोजमाप घेण्याचे शिबिर पार पडले. याचा २९ दिव्यांगांनी लाभ घेतला. लवकरच आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले हायटेक फूट बसवण्यात येणार आहेत.
विस्टियॉनचे अध्यक्ष आशिष भाटीया यांनी सीएसआर फंडाच्या माध्यमातून ही मदत देऊन आयुष संस्थेच्या कार्याला प्रोत्साहन दिले. दिव्यांगांना देण्यात येणारे हे आधुनिक पाय २५ ते ५० हजारांपर्यंतचे आहेत. असे शिबिर जिल्ह्यात प्रथमच होत आहे. दिव्यांगांच्या पायाचे मोजमाप शेरसिंग राठोड, प्रीतम पाटील, रोहित सिंग आणि ब्रिजेश प्रतापसिंग यांनी घेतले. संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील, रितेश शेठ, महावीर पाटील, अविनाश पवार, अजित कांबळे, अमोल व्हटकर, इम्तियाज बोरगावकर, भानुप्रताप देशमुख उपस्थित होते.