व्यवसाय परवान्यासाठी आजपासून शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST2021-02-09T04:30:04+5:302021-02-09T04:30:04+5:30
सांगली : शहरात विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यवसायधारकांना महापालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत व्यवसाय परवाने दिली जाणार आहेत. त्यासाठी ९ ...

व्यवसाय परवान्यासाठी आजपासून शिबिर
सांगली : शहरात विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यवसायधारकांना महापालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत व्यवसाय परवाने दिली जाणार आहेत. त्यासाठी ९ ते १२ फेब्रुवारीदरम्यान विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी दिली.
आयुक्त नितीन कापडणीस यांनी वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांच्या आदेशाने व्यवसाय परवान्यासाठी विशेष शिबिर घेण्यात येत आहे. हे शिबिर प्रभागनिहाय होणार असून, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांनी तातडीने अधिकृत परवाने घ्यावाते. सांगलीतील व्यावसायिकांसाठी दीनानाथ नाट्यगृहात शिबिर होणार आहे, तर कुपवाडसाठी विभागीय कार्यालयात तर मिरजेसाठी मनपा सभागृहात शिबिर होईल. या शिबिरात नवीन परवान्यासह नूतनीकरणाचे अर्ज स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर विनापरवाना व्यवसाय करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आंबोळे म्हणाले.