शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

लॉकडाऊनला पर्याय ठरला कामेरीचा ‘तिरंगी पास’ पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 10:35 PM

घरटी एकच पास दिल्याने कामापुरतेच लोक रस्त्यावर आले. होम क्वारंटाईन घरावर ग्रामपंचायतीने लाल रंगाचा फलक लावला, त्यामुळे त्यांचे आपोआपच विलगीकरण झाले, शिवाय तेथील रहिवासीही समाजापासून दूर राहिले. क्वारंटाईनचा कालावधी संपताच ग्रामपंचायतीने तो फलक काढून घेतला.

ठळक मुद्दे रस्त्यावरील-बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयोग यशस्वी काटेकोर नियोजन : सहा दिवस बाजारपेठ खुली, रविवारी संपूर्ण जनता संचारबंदी

संतोष भिसे ।सांगली : लांबलेल्या लॉकडाऊनमध्ये घरात सक्तीने कोंडून घ्यावे लागल्याने प्रत्येकजण मेटाकुटीला आला आहे. पण कामेरी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने लॉकडाऊन सांभाळतानाच ते सुसह्य ठरावे यासाठी ‘तिरंगी पास’चा पॅटर्न वापरला. त्यातून ग्रामस्थांची कोंडमाऱ्यातून सुटका तर झालीच, शिवाय व्यापारउदीमही सुरू राहिला.

२५ एप्रिलरोजी गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्यानंतर कोरोना प्रतिबंधित बफर झोन निश्चित केले. दैनंदिन व्यवहारांसाठी फक्त बफर झोनमधील रहिवाशांना परवानगी दिली. गावाची लोकसंख्या सुमारे २२ हजार आहे. सर्वजणएकाचवेळी बाहेर पडले तर, लॉकडाऊनचा फज्जा उडेल, हे लक्षात घेऊन तिरंगी पासचे नियोजन केले. या क्लृप्तीमुळे गर्दीवर नियंत्रण आले. दररोज फक्त हजारभर लोकच रस्त्यावर येत राहिले. अत्यावश्यकदुकाने दररोजच उघडी राहिल्याने ग्रामस्थही निर्धास्त राहिले. लॉकडाऊनसोबतच लोकांची दैनंदिनीही सुरू राहिली. घरटी एकच पास दिल्याने कामापुरतेच लोक रस्त्यावर आले. होम क्वारंटाईन घरावर ग्रामपंचायतीने लाल रंगाचा फलक लावला, त्यामुळे त्यांचे आपोआपच विलगीकरण झाले, शिवाय तेथील रहिवासीही समाजापासून दूर राहिले. क्वारंटाईनचा कालावधी संपताच ग्रामपंचायतीने तो फलक काढून घेतला.

या नियोजनामुळे महामार्गालगत असूनही कामेरी गाव कोरोनाच्या फैलावापासून दूर राहिले. गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सरपंच स्वप्नाली जाधव, पोलीस पाटील बाळासाहेब पाटील, डॉ. साकेत पाटील, सुनंदा पाटील, सुनील पाटील, दि. बा. पाटील, दिनेश जाधव, नंदकुमार पाटील, रणजित पाटील, जयराज पाटील, के शव पाटील, ग्रामसेवक आनंदराव चव्हाण, तानाजी माने, विजय जाधव आदींच्या संकल्पनेतून पॅटर्न राबवला.

अशी झाली अंमलबजावणीग्रामपंचायतीने पिवळा, गुलाबी व निळ््या रंगांचे तीन हजार पास छापले. घरटी एक दिला. पिवळ््या पासधारकांना सोमवारी व गुरुवारी बाहेर पडण्याची परवानगी दिली. गुलाबी पासधारकांना मंगळवारी, शुक्रवारी, तर निळ््या पासधारकांना बुधवारी, शनिवारी परवानगी दिली. रविवारी संपूर्ण संचारबंदी ठेवली. याची काटेकोर अंमलबजावणी केली. त्यामुळे अत्यावश्यक कामापुरतेच व मर्यादित संख्येने ग्रामस्थ बाहेर आले.

 

शंभर टक्के लॉकडाऊनमुळे ग्रामस्थांची गैरसोय होऊन अर्थचक्रही थंडावणार होते. हे लक्षात घेऊन तीनरंगी पासचा पॅटर्न वापरला. लोकांनीही प्रामाणिक अनुकरण केले. प्रसंगी ड्रोनद्वारे देखरेख ठेवली. याचे चांगले परिणाम दिसले. - शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी, वाळवा

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्या